हैदराबाद ः वृत्तसंस्था
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए)च्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. एचसीएच्या सर्वोच्च समितीने अझरविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अझरला बजावलेल्या नोटीसीत, तुमच्याविरुद्ध अनेक सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. त्यावर विचार केल्यानंतर ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेलाय, असे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अझरवर अन्य काही आरोपदेखील करण्यात आले आहेत.