Breaking News

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात अश्विन-जडेजा दोघांनाही खेळवावे; गावसकरांची सूचना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

साऊदम्पटनच्या उष्ण वातावरणामुळे कोरडी झालेली खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साहाय्य करील. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनाही भारताने खेळवावे, अशी सूचना महान माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी केली आहे. गेले काही दिवस साऊदम्पटनचे कमाल तापमान 25 अंश सेल्सिअसहून अधिक आहे, परंतु येथे मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. या महत्त्वाच्या सामन्यात फक्त गोलंदाजी नव्हे, तर अष्टपैलू कौशल्य असणारे खेळाडूच तारू शकतात, असे मत गावसकर यांनी व्यक्त केले. ‘अश्विन-जडेजा गोलंदाजीच्या मार्‍याचा जसा समतोल राखतात, तसाच फलंदाजीचा भारही भक्कमपणे सांभाळतात. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या लढतीनंतर होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बरेच काही हवामान आणि खेळपट्टी यावर अवलंबून असेल,’ असे गावसकर यांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply