Breaking News

युरो कप : डेन्मार्कला हरवून बेल्जियम बाद फेरीत

कोपेनहेगन ः वृत्तसंस्था

युरो कप चषक स्पर्धेत डेन्मार्कने जलद गोल झळकावूनही त्यांच्या पदरी निराशा पडली. बेल्जियमने डेन्मार्कचा 2-1ने पराभव केला. जलद गोल झाल्यानंतर बेल्जियमवर दडपण आले होते, मात्र हे दडपण दूर सारत बेल्जियमने दुसर्‍या सत्रात कमबॅक केले. दोन गोल झळकावत त्यांनी सामन्यावर मजबूत पकड मिळवली. या विजयासह बेल्जियमचे बाद फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. यापूर्वीच्या सामन्यात बेल्जियमने रशियाला 3-0ने मात दिली होती. त्यामुळे आता दोन सलग विजयांसह बेल्जियम संघाने बाद फेरीत धडक दिली आहे, तर डेन्मार्कचे बाद फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले आहे. या सामन्यातील हा डेन्मार्कचा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी फिनलँडने डेन्मार्कला 1-0ने मात दिली होती. दुसर्‍या सत्रातील सामना सुरू झाल्यानंतर बेल्जियमने आक्रमक खेळी केली. सामन्याच्या 54व्या मिनिटाला थोरगन हझार्ड याने गोल झळकावत सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतरही बेल्जियमने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. सामन्याच्या 70व्या मिनिटाला केविन ब्रुयनेने एक गोल मारत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पहिल्या सत्रात असलेले सर्व दडपण डेन्मार्क संघावर गेले. सामन्यात बरोबरी साधण्यासाठी शेवटपर्यंत त्यांची दमछाक झाली. अखेर बेल्जियमने बाजी मारली आणि बाद फेरीत प्रवेश केला.

पॉलसेनने केला जलद गोल

डेन्मार्कच्या युसूफ पॉलसेनने बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात युरो चषक स्पर्धेत सर्वांत जलद गोल झळकाविला. हा गोल सामना सुरू झाल्यानंतर 1 मिनिटे आणि 39 सेकंद झाली असताना झळकविण्यात आला. या गोलनंतर जलद गोल करणार्‍या खेळाडूंच्या यादीत डेन्मार्कच्या पॉलसेनला स्थान मिळाले आहे. या यादीत रशियाच्या दीमित्री किरीचेनको याचे नाव आघाडीवर आहे. त्याने युरो चषक 2004 या स्पर्धेत जलद गोल झळकविण्याचा विक्रम केला होता. ग्रीसविरुद्धच्या सामन्यात 1 मिनिट 7 सेकंद झाली असताना त्याने हा गोल केला होता.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply