Breaking News

चोरीस गेलेला 60 लाखांचा मुद्देमाल रायगड पोलिसांनी मूळ मालकांना केला परत

अलिबाग : प्रतिनिधी

चोरीच्या प्रकरणात जप्त केलेला  60 लाख रुपयांचा  मुद्देमाल रायगड पोलिसांनी 29 मुळ मालकांना परत केला. यात सोन्याचे दागिने, मोबईल, वाहने आदीचा  समावेश आहे.

रायगड पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात शुक्रवारी (दि. 17) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा मुद्देमाल मालकांच्या ताब्यात देण्यात आला. या कार्यक्रमास कोकण परीक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उपाधीक्षक (गृह) जगदीश काकडे उपस्थित होते.

रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या चोरी, घरफोडी, फसवणूक आदी प्रकरणांचा तपास करत असताना या गुन्ह्यामंधील आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी 29 प्रकरणांमधील 1105 गॅ्रम सोन्याचे दागीने, 65 ग्रॅम चांदीचे दागीने, रोख रक्कम, मोबाईल्स, तीन वाहने असा एकूण 60 लाख 18 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला होता. त्याची ओळख पटवून न्यायालयाच्या परवानगीने हा मुद्देमाल मुळ मालकांना परत करण्यात आला.

चोरीस गेलेल्या वस्तूची किंमत महत्वाची नसते. या वस्तुमध्ये लोकांच्या भावना असतात, त्या जास्त महत्वाच्या असतात. एखाद्या महिलेचे मंगळसूत्र चोरीस गेल्यास मंळसूत्राच्या किमतीपेक्षा त्या मंगळसुत्रात तीच्या भावना असतात. म्हणून ती दुःखी असते. त्यामुळे चोरीस गेलेले मंगळसूत्र जेंव्हा तीला परत मिळते, तेव्हा तीला आनंद होतो, असे कोकण परीक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक संजय माहिते यावेळी म्हणाले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply