Breaking News

गाढी नदी परिसरात वृक्षारोपण; वकील महिलांचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील वकील महिला एकत्र येऊन त्यांनी पनवेलमधील गाढी नदी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम निसर्ग मित्र पनवेल संस्थेच्या सहकार्याने आयोजित केला होता.

सुरुवातीला भरत ठाकूर यांनी निसर्ग मित्र संस्थेचा सर्वांना परिचय करून दिला. महिला वकील यांनी आणलेल्या 14 ते 15 वेगवेगळ्या वृक्षांची म्हणजेच वड, पिंपळ, जांभूळ, आंबा इत्यादीचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमातील महिला वकील सहभागी झाल्या. त्यामध्ये अ‍ॅड. मनीषा गायकर, अस्मिता भुवड, वर्षा हजारे, मनीषा गावंड, जान्हवी वाडकर, पौर्णिमा सुतार, ज्योती ऊरणकर, जयश्री दाभोळकर, अश्विनी पाटील, प्रगती ठाकूर, मनीषा वैदु, कामिला बेग तसेच आरती चाळके व प्रियंका राऊत   यावेळेस निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष मंदार कर्वे, अरविंद गोडबोले, धनंजय पाटील, रोहित पाटील, सौ व श्री कानिटकर व श्री. शिवप्रसाद निकम उपस्थित होते. भर पावसामध्ये अतिशय उत्साहात व आनंदाच्या वातावरणात हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

Check Also

कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा

मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …

Leave a Reply