Tuesday , February 7 2023

कर्जत पोलिसांनी उधळली फार्महाऊसमधील पार्टी

34 जणांवर गुन्हा दाखल

कर्जत ः बातमीदार
कोविड-19च्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून कर्जत तालुक्यातील एका फार्महाऊसमध्ये सुरू असलेली मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील पर्यटकांची पार्टी पोलिसांनी उधळली. या प्रकरणी 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील अविज व्हिलेज फॉर्म हाऊस रेस्टॉरंटमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसून पार्टी सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे धाड टाकली असता, भरपूर लोकांची गर्दी असल्याचे आढळून आले. यात मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील एकूण 34 तरुण-तरुणींचा समावेश होता. या सर्वांवर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply