Breaking News

गणेश मूर्तिकारांनाही कोरोनाचा फटका

आगाऊ मागणी अद्याप कमीच

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

देशभरात कोरोनाने थैमान घातल्याने याचा सर्वच उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. सध्या काही उद्योगधंदे सुरू झाले असले तरीसुद्धा पूर्वीसारखी कमाई होत नाही. याच दरम्यान आता अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग सुद्धा दिसून येत नाही. जून महिना संपत आला मुर्ती बनण्यासाठी अद्याप नोंदणीच आली नसल्याने याचा सर्वाधिक फटका मुर्तिकारांना बसला आहे.

शासनाने नियमावली उशीरा जाहीर केल्याने दोन वर्षांपासून सार्वजनिक मंडळाच्या नोंदणीच होत नाही. कोरोनाच्या आधी मे महिन्यातच 50 टक्के नोंदणी केल्या जात होत्या, मात्र आता घरगुती मूर्त्यांची नोंदणी दहा टक्केच झाली, मात्र सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते अजून फिरकलेच नाहीत. नवी मुंबईतील स्थानिक मुर्तीकाराना दोन वर्षांपासून कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यात नवी मुंबईतील स्थानिक मुर्तीकारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर चार महिन्यांसाठी भाडेतत्वावर जागादेखील मनपा प्रशासनाकडून मिळत नसल्याने मूर्ती घडविण्यासाठी मुर्तीकारांना जागे अभावी ज्याठिकाणी जागा मिळेल तिथे कारखाना उघडावा लागतो त्यासाठी त्यांना अधिक पैसेदेखील मोजावे लागतात. नवी मुंबई महापालिकेकडून मुर्तीकाराने कोणतीच सुविधा मिळत नसल्याची नाराजी मूर्तिकार संघटनेकडून व्यक्त केली जाते.

स्थानिक श्रीगणेश मूर्तीकार आज अखेरची घटका मोजत आहेत. त्यामुळे शहरात फक्त स्थानिक मूर्तिकारांनाच श्रीमूर्ती विक्री करण्याची परवानगी देण्याची गरज आहे. नवी मुंबई शहरात श्रीगणेश मूर्तीकारांना जागेची कमतरता भासत आहे. श्रीगणेश मूर्तीकारांकडून जागा मिळण्यासाठी मागील 13 वर्षांपासून नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अजूनही श्रीगणेश मूर्तीकारांना जागा मिळण्याचा प्रश्न अधांतरितच आहे. त्यामुळे एमआयडीसी भागात मूर्ती कारखान्यांसाठी कायम किंवा हंगामी जागा महापालिकेने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नवी मुंबई श्री गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष गणेश चौलकर यांनी केली आहे.

ज्याप्रमाणे मुंबई महापालिका ही तीन महिन्यांसाठी मुर्तीकारांना जागा भाड्याने देते त्याच तत्वावर नवी मुंबईतील मुर्तीकारांनादेखील जागा भाडेतत्वावर देण्यात यावी, अशी मागणी ही होत आहे. दर वर्षीप्रमाणे याही वर्षी कच्चा माल 20 टक्क्यांनी वाढला आहे. शाडू माती किंवा प्लस्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांबाबतदेखील  मुर्तीकारा मध्ये आज ही संभ्रम कायम आहे.

मागील वर्षी मोठ्या गणेश मूर्ती तयार असतानाच कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने श्रीगणेश मूर्तीच्या उंचीवर निर्बंध घातल्याने मोठ्या मूर्ती तशाच पडून राहिल्याने श्रीगणेश मूर्तीकारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. अजूनही कोरोना संपलेला नाही. राज्य शासनाने श्रीगणेश मूर्ती विषयक सूचनाही उशीरा जाहीर केल्या.

 -संतोष चौलकर, अध्यक्ष श्री गणेश मूर्तीकार संघटना, नवी मुंबई

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply