Breaking News

पनवेल मनपाची स्थायी समितीची ऑनलाइन सभा

विविध विषयांना मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची ऑनलाइन सभा बुधवारी (दि. 30) मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.

कळंबोली येथील कम्युनिटी सेंटरमधील मेडिकल ऑक्सिजन सुविधा विना विलंब व विना खंडीत आवश्यकतेसाठी (24 बीएआर, 247 लिटर) चार सिलेंडर महानगरपालिका अधिनियम कलम 67(3) (क) तसेच महानगरपालिका अधिनियम प्रकरण 5:2:2 नुसार घेण्यास मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिका हद्दीतील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या जागेवर हायवेच्या दुतर्फा बाजुस वृक्षारोपण करण्याच्या कामास  परवानगी देण्यात आली.

पनवेल महानगरपालिकेच्या विविध विभागाकरिता सन 2021-2022 व सन 2022-2023 या अर्थिक वर्षांसाठी व सन  2023-2024च्या निविदा मंजूर होईपर्यंतच्या कालावधीसाठी आवश्यकतेनुसार कार्यालयीन कामकाजकरिता आवश्यक छपाई करण्यासाठी जाहीर ई निविदा प्रसिध्द करून दर निश्चित करण्याचा विषय, पनवेल महानगरपालिका करीता किटकनाशके व रासायनिक जंतूनाशके पुरविणेबाबतचा विषय व पनवेल महानगरपालिका मालकीचे व्यापारी संकुलातील बिगरनिवासी गाळे आरक्षणानुसार हस्तांतरीत करणे व हस्तांतरीत शुल्क आकारणी करण्याच्या विषयावर चर्चा करून ते स्थगित करण्यात आले.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत सन 2015-2016, 2016-2017 अंतर्गत हरित क्षेत्र विकसित केलेल्या, वृक्षलागवड व लॉन या झालेल्या कामाची निगा, दुरुस्ती, देखभाल करणेबाबत (सन 2019-20 ते 2021-22 करीता व 24 महिन्यांकरीता वार्षिक दर मंजूर करणेबाबत) हा विषय स्थायी समितीने नामंजूर करून नवीन निविदा काढण्यास सांगितल्या.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply