Breaking News

ईडीचे कारवाईसत्र सुरूच; अभिनेता डिनो मोरियासह चौघांची संपत्ती जप्त

मुंबई ः प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्यानंतर आता अभिनेता डिनो मोरिया ईडीच्या रडावर आला आहे. डिनोची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. डिनोसोबतच डीजे अकील बच्चुअली, अभिनेता संजय खान आणि इरफान सिद्दीकी यांच्यावरही ईडीने कारवाई केली आहे. या चौघांवर पैशांच्या अफरातफरीचा (मनी लॉण्ड्रिंग) आरोप आहे. ईडीच्या आदेशान्वये पीएमएलए कायद्यांतर्गत या चारही जणांच्या एकूण 8.79 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. यात अभिनेता डिनो मोरियाची 1.4 कोटींची, संजय खानची तीन कोटी, इरफान सिद्दीकीची 2.41 कोटी, तर डीजे अकीलची 1.98 कोटींची मालमत्ता आहे. यामध्ये आठ स्थावर मालमत्ता, तीन आलिशान वाहने, काही बँक खाती, बँकांचे समभाग व म्युच्युअल फंडातील रकमेचा समावेश आहे. या प्रकरणी कथितरित्या एकूण 14 हजार 500 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. स्टर्लिंग बायोटेक कंपनीचे प्रवर्तक असलेले नितीन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतनची पत्नी दीप्ती संदेसरा आणि हितेश पटेल हे सध्या फरार असून त्यांनी विविध बँकांकडून कर्ज घोटाळ्यातून मिळालेली संपत्ती काही निवडक लोकांकडे सोपवली होती. बँकांची आर्थिक फसवणूक प्रकरणाची चौकशी करीत असताना ईडीला डिनो मोरिया आणि इतरांनी संदेसरा बंधूंशी आर्थिक व्यवहार केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, ईडीने केलेल्या कारवाईनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी डिनो मोरियावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात की, डिनो हा मुंबई महानगरपालिकेतील वाझे आहे. या प्रकरणात अधिक चौकशी केली तर अनेक पेंग्विनची प्रकरणे उजेडात येतील. आमच्याकडे तसे पुरावे आहेत. अभिनेता डिनो मोरिया आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई अभिनेता संजय खान आणि डीजे अकील यांच्या कोटींच्या मालमत्तांवर यांच्या संपत्तीवरही ईडीने कारवाई केली आहे. 14,500 कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्यासंदर्भात खटला दाखल झाला आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply