खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर चौपाटी सेक्टर 17 येथे नगरसेविका संजना समीर कदम यांच्या नगरसेवक निधीमधून सुरू केलेल्या विविध सेवांचे लोकार्पण आणि वृक्षारोपण सोहळा शनिवारी (दि. 3) महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला. खारघर येथे प्रभाग 06मध्ये नगरसेविका संजना कदम यांच्या नगरसेवक निधीमधुन ओपन जिम, हायमास्ट दिवे, डस्टबीन, बेंचेस, वृत्तपत्र वाचनालय आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच यावेळी खारघर चौपाटी येथे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेविका संजना कदम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, समीर कदम, संतोष शर्मा, नवनाथ गाडवे, राजु आचलकर, प्रणय मोरे, भिमराव गेंड आदी उपस्थित होते.