लखनऊ ः काँग्रेसमधील कलह लवकर संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या ’लेटर बॉम्ब’नंतर आता आणखी एक ’लेटर बॉम्ब’ फुटला आहे. या वेळी तो उत्तर प्रदेशचा आहे. गेल्या वर्षी पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेल्या काँग्रेसच्या नऊ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. काँग्रेस पक्षाला इतिहासजमा होण्यापासून वाचवा. घराण्याच्या मोहातून बाहेर पडून पक्षासाठी काम करावे, असे आवाहन या नेत्यांनी पत्रातून केले आहे. उत्तर प्रदेशातील माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयंप्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह यांची स्वाक्षरी असलेले हे पत्र आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस सर्वांत वाईट काळातून जात आहे, असे या नेत्यांनी पत्रात म्हटले आहे.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …