Breaking News

केमस्पेक् कंपनीत वेतनवाढीचा करार; जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या वतीने तळोजा एमआयडीसीमधील केमस्पेक् केमिकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांसाठी पगारवाढ व इतर सोयीसुविधांचा करार शनिवारी (दि. 3) करण्यात आला. हा करार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत व एचआर मॅनेजर अभय रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पगारवाढीच्या या करारानुसार कंपनीचे वेंकटेश एंटरप्राइजेस व जिके फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा लि या कॉन्ट्रॅक्टरच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कामगारांपैकी सात कामगारांना कायमस्वरूपी करण्याचा निर्णय झाला असून पगारामध्ये 7750 रुपयांची वाढ व इतर सर्व सोयीसुविधा देण्याचे मान्य झाले आहे. कराराच्या वेळी युनिट अध्यक्ष संतोष घरत, उपाध्यक्ष अंकुश घरत, सेक्रेटरी रुपेश ठाकूर, सचिव जीवन भोईर, सदस्य बळीराम भोईर, अतिष भगत, चंद्रकांत कडू यांच्यासह कामगार उपस्थित होते.

Check Also

पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार

महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 …

Leave a Reply