पनवेल : रामप्रहर वृत्त – आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठ माणघर ट्रस्टचे मालक संजू पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गूरु संत श्री तुकाराम महाराज स्मारकाची स्थापना करण्यात आली. या स्मारकाचे अनावरण भागवताचार्य हभप महेश महाराज साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.
तुकोबाराय आणि शिवछत्रपती हे दोन स्वयंभू सूर्य महाराष्ट्राच्या क्षितिजावर एकाच काळात उगवले. तुकोबारायांनी भक्तीचा मार्ग दाखवला तर शिवछत्रपतींनी धारकरी सांप्रदाय उत्पन्न केला.जगद्गूरु तुकोबाराय म्हणजे भक्तीची उपासना आणि छत्रपती शिवराय म्हणजे शक्तीची उपासना असे हे भव्य भक्ती-शक्ती स्मारक श्री स्वामी समर्थ ट्रस्टचे संस्थापक संजू पाटील यांनी या दोन्ही महापुरुषांचा आदर्श घेऊन आपला समाज जगला पाहिजे या उद्देशाने हे स्मारक उभे केले आहे.