Breaking News

म्हणूनच ‘ते’ पत्र लिहिले

आमदार प्रताप सरनाईक यांचे ‘मविआ’वर शरसंधान

मुंबई ः प्रतिनिधी
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारविरोधातील खदखद बोलून दाखवली आहे. माझ्यावरील संकटावेळी महाविकास आघाडीचे नेते माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, असे सांगून प्रताप सरनाईक यांनी ‘मविआ’वर शरसंधान साधून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सरनाईक हे आघाडी सरकारवर नाराज असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
आमदार सरनाईक यांनी सोमवारी (दि. 5) पावसाळी अधिवेशनासाठी सभागृहात जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधताना आघाडी सरकारविरोधातील त्यांच्या मनातील खदखदही बोलून दाखवली. माझ्या कुटुंबीयांवर घाला घातला जात होता किंवा आरोप केले जात होते, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता. आपण महाविकास आघाडीवर होणार्‍या सर्व आरोपांना उत्तरे दिली. अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते, पण तसे झाले नाही. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. त्यामुळे मी चुकीचे काही केले असे वाटत नाही, असे सरनाईक यांनी सांगितले. आमदार सरनाईक यांच्या विधानावरून अनेक अर्थ काढले जात आहेत. सरनाईक आघाडी सरकार आणि शिवसेनेवरही नाराज असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply