Breaking News

रायगडातही शिवसेनेचे एकला चलो रे!; जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळाचा नारा

अलिबाग ः प्रतिनिधी

राज्यात शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसह महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत आहे, मात्र असे असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर जिंकण्याच्या दृष्टीने कामाला लागा, असा संदेश रविवारी (दि. 11) शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारिणी सभेत देण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन येथे घेतलेल्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर रविवारी शिवसेना रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक अलिबाग येथे झाली. या वेळी शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी आणि संपर्कप्रमुख विलास चावरी यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. युती, आघाडी होईल किंवा नाही याची वाट न पाहता जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे दळवी यांनी सांगितले. संपर्कप्रमुख विलास चावरी यांनीही असाच नारा दिला. दरम्यान, शिवसेनेच्या या पवित्र्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply