Breaking News

व्यापारी संकुलात सीसीटीव्ही बसवावेत- तेजस कांडपिळे

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या शिवाजी पुतळ्याशेजारी असलेल्या विलासराव देशमुख व्यापारी संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की या संकुलात शहरातील टपाल कार्यालयही नुकतेच स्थलांतरित झालेे आहे. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे या ठिकाणी असतात. या संकुलात लोखंडी ग्रिल देखील अद्याप बसविण्यात आले नसल्याने चोर्‍यांसारखे प्रकार घडू शकतात. येथील ऐवज व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी लोेखंडी ग्रील व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. हा परिसर गजबजलेला असल्याने मोठ्या प्रमाणात पनवेलसह बाहेरील नागरिक बाजारहाटसाठी येत असतात. त्याचप्रमाणे येथे पालिकेची विविध कार्यालये व इतर खाजगी दुकाने असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply