Breaking News

रोह्यात उद्या भाजपची बैठक

पेण, रोहा : प्रतिनिधी
बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश संपादन केल्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपालिकांवर लक्ष केंद्रित केले असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने रोहा नगरीत गुरुवारी (दि. 19) भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आमदार रविशेठ पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते हे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत येथील नगर परिषद निवडणुकीच्या व्युहरचनेवर शिक्कामोर्तब करणार आहेत.
रायगड जिल्ह्यात भाजपची दिवसेंदिवस ताकद वाढत असून, मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार निवडून आल्याने पक्षकार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. येत्या काळात जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायतींमध्ये भाजपचे वर्चस्व राहावे यासाठी रोह्यात गुरुवारी दुपारी 12च्या सुमारास होणार्‍या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत तीन आमदार सहभागी होऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहेत.
सबका साथ सबका विकास या अभियानाला जोडून आता राज्यातील विरोधकांना शह देण्यासाठी जॉईन बीजेपी अभियान अंतर्गत मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपची विशेष बैठक रोहा नगरीपासून सुरू होत आहे. त्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply