Breaking News

माथेरान म्हणजे नैसर्गिक ऑक्सिजन केंद्र -जिल्हाधिकारी

कर्जत : बातमीदार
घनदाट जंगलामुळे माथेरान हे ऑक्सिजनचा खजाना असलेले केंद्र असून येथे आल्यावर मन प्रसन्न होते, असे प्रतिपादन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी निधी चौधरी या परिवारासोबत माथेरानला पर्यटनासाठी आल्या आहेत. खाजगी दौरा असूनही त्यांनी येथील बी. जे. हॉस्पिटलमधील कोविड वार्ड, ओपीडी, ऑक्सिजन यंत्रणा यांची पहाणी केली. तसेच तेथील सुविधा व गैरसोयींची माहिती घेतली.
माथेरान नगर परिषद कार्यालयाला भेट देऊन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्याशी संवाद साधला. या वेळी माथेरानमधील शिक्षण संस्था, प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभीकरण तसेच माथेरान ब्रॅण्ड बिसलेरी प्लांट उभारण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकार्‍यांना माहिती देण्यात आली. कोरोना काळात उत्पन्नात घट झाल्याने नगर परिषदेला भेडसावत असणार्‍या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील असे जिल्हाधिकारी चौधरी यांनी या वेळी स्पष्ट केले.
माथेरानला प्रसिद्धी देण्यासाठी येथे चित्रपटांच्या चित्रिकरणावर भर देण्याची गरज असून पुर्वी माथेरानमध्ये चित्रिकरण होऊन प्रदर्शित झालेल्या  चित्रपटांचे पोस्टर येथील प्रेक्षणीय स्थळांवर लावावेत, त्यामुळे माथेरानची वेगळी ओळख निर्माण करता येईल असेदेखील त्यांनी सुचविले.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply