पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 783 नव्या कोरोना रुग्णांची आणि 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 13) झाली. यासोबतच जिल्ह्याने हजार बळींचा टप्पा ओलांडला आहे, तर दिवसभरात 653 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 334, अलिबाग 88, पेण 76, माणगाव 75, कर्जत 43, खालापूर 36, रोहा 35, महाड 34, उरण 20, पोलादपूर नऊ, तळा आठ, श्रीवर्धन व म्हसळा प्रत्येकी सात, मुरूड सहा आणि सुधागडातील पाच जणांचा समावेश आहे; तर मृत रुग्ण पनवेल पाच, कर्जत व पेण प्रत्येकी तीन, तळा दोन आणि खालापूर, अलिबाग, रोहा, म्हसळा व महाडमधील प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 37,126 व मृतांची संख्या 1006 झाली आहे. जिल्ह्यात 29,561 जण कोरोनामुक्त झाल्याने 6559 विद्यमान रुग्ण आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper