वावेघरमध्ये ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड आणि ग्रामपंचायत हद्दीत हायमास्टचे लोकार्पण
मोहोपाडा : प्रतिनिधी
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून वावेघर भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी वावेघरमधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रात कोठेही एसटीचा प्रवास निम्म्या खर्चात व्हावा ह्याकरिता स्मार्ट कार्ड नोंदणी व वाटप ह्या सेवेचा लाभ व्हावा याकरीता शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा बहुसंख्य ज्येष्ठांनी लाभ घेतला तसेच वावेघर ग्रामपंचायत हद्दीत पंचायत समिती समाजकल्याण सेस फंडातून उपसरपंच संध्या महादेव कांबळे यांच्या प्रयत्नाने हायमास्ट दिवा लावण्यात आला. या हायमास्टचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच विजय नामु चव्हाण, सावळे सरपंच प्रशांत माळी, माजी सरपंच तथा भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, माजी सरपंच शिवाजी माळी, पनवेल भाजप झोपडपट्टी सेलचे मुख्य संयोजक महादेव कांबळे, वावेघर ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक गायकर, माजी उपसरपंच विलास माळी, भाजपचे मनोज पवार, भाजप वावेघर बूथ अध्यक्ष दामोदर माळी, कार्यकर्त्या इंदूबाई खुडे, ज्येष्ठ नागरिक आमीन गौडा, फुलचंद सरवदे, रामू चव्हाण आदी उपस्थित होते.
पिरकोनमध्ये शालोपयोगी वस्तूंचे विद्यार्थ्यांना वाटप
उरण : वार्ताहर
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील पिरकोन गावचे भाजप उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 17) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भाजप पिरकोन यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. या वेळी मुकुंद गावंड यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते मंगेश गावंड, उरण तालुका ओबीसी सेल सचिव प्रा. प्रमोद म्हात्रे, उरण तालूका पदाधिकारी रवींद्र म्हात्रे, पिरकोन उपाध्यक्ष बाळकूष्ण पाटील, भाजप पिरकोन सचिव नितीन गावंड, गजानन गावंड, रघुनाथ म्हात्रे, संजय पाटील आदी भारतीय जनता पक्षाचे पिरकोन येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शालेय मुख्याध्यापिका प्रियांका चंद्रकांत गायकवाड तसेच शालेय शिक्षिका कविता अविनाश कोळी यांच्या हस्ते गरजू मुलांना साहित्य वाटप करण्यात आले.