Breaking News

स्टोन क्रशर पुन्हा होणार सुरू

व्यावसायिकांना दिलासा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
गेले काही दिवस बंद असलेल्या स्टोन क्रशर क्वॉरी प्लांटमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत होते. हा व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा म्हणून स्टोन क्रशर कॉरी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेतली. तहसीलदारांनी योग्य जागेवर योग्य रॉयल्टी भरणार्‍या व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे या व्यावसायिकांना मिळाला दिलासा मिळाला आहे.
या शिष्टमंडळात आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार मनोहर भोईर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, आर. सी. घरत आदींसह स्टोन क्रशर क्वॉरी व्यावसायिकांचा समावेश होता.
या वेळी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, मुंबईतून काही उच्च न्यायाधीश येथील जागेची पाहणी करण्याकरिता येणार असल्याकारणाने प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या विनंतीवरून स्टोन क्रशर क्वॉरी व्यावसायिकांनी जवळपास एक आठवडा त्यांचे प्लांट बंद ठेवले होते. न्यायाधीशांच्या अपेक्षित भेटीनंतरसुद्धा हे प्लांट सुरू करण्यात न आल्याने व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत होता. त्यांची कैफियत मांडण्यासाठी व्यावसायिकांचे शिष्टमंडळ आज तहसीलदारांना भेटले. योग्य जागेवर योग्य रॉयल्टी भरणार्‍या व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू करण्यास हरकत नसल्याचे तहसीलदार तळेकर यांनी सांगितले आहे तसेच सिडकोच्या भूखंडांवर ज्यांचे प्लांट उभे आहेत त्यांनादेखील व्यवसाय करण्यास अनुमती मिळाली आहे. लवकरच आम्ही स्टोन क्रशर प्लांट व्यावसायिक, सिडको अधिकारी आणि प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन व्यावसायिकांच्या समस्या विस्ताराने मांडणार आहोत.
या वेळी मनसेचे अतुल भगत, मयूर भोईर, उदय ठाकूर, सुनील भोईर, मनोज आंग्रे हेही उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply