पोयंजे विभागात ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड
पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पक्ष पोयंजे विभागाच्या वतीने भाताण, भाताणपाडा, कसळखंड, आष्टे, अरिवली व शिवाजीनगर गावातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास अर्ध्या दराने करण्याकरिता मंडळाचे स्मार्ट कार्ड बंधनकारक आहे. या स्मार्ट कार्डचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळावा, यासाठी भाताण गावामध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा 90 ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला तसेच याच कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक बबन मुकादम, जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती प्रिया मुकादम, कसळखंड ग्रामपंचायतीचे प्रभारी माजी सरपंच अनिल पाटील, गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, पोयंजे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, भाताण ग्रामपंचायतीचे सदस्य तानाजी पाटील, प्रविण ठाकूर, गणेश अगिवले, महेंद्र गोजे, मेघश्याम पाटील, सुनिल भोईर, रोहित घरत, सचिन पाटील, सुनील चव्हाण, गणेश जुमारे, अनिल भोईर, काशिनाथ पाटील, गुरुनाथ खारके, कृष्णा भोईर, धनाजी पाटील, शिवाजी माळी, विकास ठाकूर, विवेक ठाकूर, कृष्णा पाटील, अशोक भोईर आदी उपस्थित होते.
रानसईत गरजूंना कपडेवाटप
उरण : वार्ताहर
उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील रानसई (खैरकाटी) येथील भाजप कार्यकर्ते तथा रानसई ग्रामपंचायत उपसरपंच सुरेश पारधी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 17) खैरकाटी समाजशेड येथे कपड्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सुरेश पारधी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य राधा नामदेव दोरे, ज्ञानेश्वर उघडा, काळूराम भगत, नामदेव शिंगवा, शैलेश मोरे, राम भगत, रवींद्र शिंगवा, बबुलू लेंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
