Breaking News

कर्जतमध्ये 23 सदस्य बिनविरोध

थेट सरपंच पदासाठी 19; तर 59 सदस्यांसाठी 126 उमेदवार रिंगणात

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 24 फेब्रुवारी रोजी होत आहेत. त्यासाठी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सदस्यांसाठी 165, तर सरपंच पदासाठीचे 27 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता थेट सरपंच पदाच्या आठ जागांसाठी 19 उमेदवार, तर ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 59 जागांसाठी 126 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, निवडणूक होत असलेल्या सहा ग्रामपंचायतींमधील 23 उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत.

सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींपैकी भालीवडीमधील सर्व 11 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत, मात्र तेथे नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी राखीव असलेल्या थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. हालीवली ग्रामपंचायतीमधील 9 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या असून, तेथे आता थेट सरपंच आणि तीन सदस्य निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे. पळसदरी ग्रामपंचायतीमधील 9 पैकी तीन सदस्य बिनविरोध निवडले गेले असून, तेथे थेट सरपंच आणि 6 सदस्य निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे, तर सावेळे, खांडपे आणि किरवली या तीन ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदासाठी किरवली, भालीवडी, हालीवली, खांडपे, ममदापूर, चिंचवली आणि सावेळे येथे दुरंगी, तर पळसदरी येथे पंचरंगी लढत होणार आहे. या आठ ग्रामपंचायतींमध्ये 23 सदस्य बिनविरोध निवडले गेले असून उर्वरित 59 जागांसाठी आता 126 उमेदवार यांच्यात लढत होणार आहे.

निवडणूक अशी होणार

भालीवडी-थेट सरपंच 2, सदस्य-0

हालीवली-थेट सरपंच 2, सदस्य 3 जागांसाठी 7 उमेदवार

ममदापूर -थेट सरपंच 2, सदस्य 9 जागांसाठी  20 उमेदवार

पळसदरी-थेट सरपंच 5, सदस्य 6 जागांसाठी 13 उमेदवार

खांडपे-थेट सरपंच 2, सदस्य 10 जागांसाठी 21 उमेदवार

चिंचवली-थेट सरपंच 2, सदस्य 9 जागांसाठी 19 उमेदवार

किरवली-थेट सरपंच 2, सदस्य 10 जागांसाठी 21 उमेदवार सावेळे-थेट सरपंच 2, सदस्य 12 जागांसाठी 25 उमेदवार

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply