Breaking News

माथेरानमध्ये इंटरनेट सेवा बंद

कर्जत : बातमीदार

उंचावर वसलेल्या माथेरानला निसर्ग चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला असून येथील वीज पुरवठा रात्री पासून सुरू झाला आहे. तर तिसर्‍या दिवशीही  इंटरनेट सेवा बंद होती. दरम्यान, दूरसंचार सेवा बंद असल्याने माथेरान मधील बँक आणि एटीएम देखील बंद असून संपर्क यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असून रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम अद्याप सुरू आहे.

माथेरानमध्ये खासगी आणि सरकारी दूरसंचार यंत्रणा यांचे टॉवर आहेत. मात्र त्यातून मिळणारे नेटवर्क 3 जूनपासून मिळत नाही. बीएसएनएलची सेवा आणि अन्य खासगी मोबाइल तसेच इंटरनेट सेवा या अद्याप कार्यान्वित झाल्या नाहीत. त्यामुळे माथेरानकरांचा जगाशी संपर्क तुटला आहे. तीन दिवसानंतर देखील माथेरान मधील संपर्क यंत्रणा पूर्ववत झाली नाही.

खोपोलीत 48 तासांनंतर वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत

खोपोली : प्रतिनिधी

48 तासांच्या प्रतीक्षेनंतर खोपोली शहरातील वीजपुरवठा व पाणीपुरवठा सामान्य होत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील वीजपुरवठा व पाणी वितरण प्रणाली सुरळीत करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रासाठीचा  वीजपुरवठाही पूर्वरत करण्यासाठी स्वतंत्र टीम दिवसरात्र काम करीत आहे. निसर्ग चक्रीवादळ चा मोठा फटका विजवितरण ला बसला असून खोपोली हद्दीत जवळपास 52 विजेचे खांब व असंख्य विजेच्या तारा विस्कळीत झाल्या होत्या त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले असून, काही दुर्गम ठिकाणी विजेचे खांब व तारा कोसळया असल्याने काही ठिकाणी दुरुस्ती करण्यात अडचणी येत असल्याने या ठिकाणी स्थिती सामान्य होण्यात  काहीसा विलंब लागणार असून, विजवितरण कर्मचारी व अधिकारी दिवसरात्र मेहनत करीत आहेत.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply