Breaking News

मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत

गुरव समाजाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पेण : प्रतिनिधी

कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्याने मंदिरे खुली करावीत, अशी मागणी रायगड मुंबई गुरव समाज संघटनेेचे खजिनदार बंडू खंडागळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे गेली दोन वर्षे बंद असल्याने अनेक गुरव समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर मंदिराबाहेरील फूल, हार, नारळ, विक्रेते, अन्य व्यावसायिकांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे बंद असलेली मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले, त्या वेळी अखिल गुरव समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय ठोसर, जिल्हाध्यक्ष अमोल गुरव, कार्याध्यक्ष सुरेश गुरव, भालचंद्र गुरव, महिलाध्यक्ष आदिती पवार, कार्यकारिणी सदस्य प्रकाश गुरव, संदीप गुरव, हरेश खंडागळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन गुरव, खोपोली शहराध्यक्ष निलेश खंडागळे, राजेश गुरव आदि उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply