Breaking News

नवी मुंबईची सागरकन्या मंत्रा कुर्‍हेचा धरमतर ते गेटवे पोहण्याचा नवा विक्रम

नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रहिवासी व वाशीच्या फादर आग्नेल हायस्कूलची इयत्ता सातवीत शिकणारी 12 वर्षीय विद्यार्थिनी मंत्रा मंगेश कुर्‍हे या सागरकन्येने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 38 किमीचे सागरी अंतर अवघ्या सात तास आणि 54 मिनिटांत पार करून पोहण्यातील एक नवा विक्रम केला आहे. याआधी हेच अंतर आठ तास 18 मिनिटांत पार करण्याचा विक्रम एका महिला जलतरणपटूच्या नावावर होता जो मंत्राने मोडला आहे.
मंत्राने 20 मार्च रोजी रात्री 1 वाजून 10 मिनिटांनी धरमतरच्या खाडीत आरंभीचा सूर मारून पोहण्यास सुरुवात केली. सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी तिने गेट वे ऑफ इंडियाच्या प्रवेशद्वार गाठले. हे 34 किमीचे सागरी अंतर पाक़्र करताना मंत्राला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. कधी विरुद्ध दिशेचा लाटांचा प्रवाह तिला मागे ढकलत होता, तर कधी समुद्रातील जेलीफिश तिला टोचून जात होते, मात्र या सर्वांना न घाबरता नेटाने तिने सात तास आणि 54 मिनिटांत हे अंतर पार करण्याचा मुलींमधील एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
या वेळी माजी नगरसेवक मुनावर पटेल यांनी मंत्राचे स्वागत केले. तिच्या या विक्रमामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. याआधी मंत्राने बरोबर एक वर्षापूर्वी 21 मार्च 2021 रोजी एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी अंतर दोन तास 51 मिनिटांत कापून मुलींमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता, ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. मंत्राला प्रशिक्षक गोकुळ कामत आणि अमित आवळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply