Sunday , February 5 2023
Breaking News

डिजिटल विद्यालयांमध्ये ‘सीकेटी’ची निवड

पनवेल ः रामप्रहर वृत्त
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज, पुणे यांनी विकसित केलेल्या ग्रोइंग डॉट्स शैक्षणिक या अ‍ॅपतर्फे गर्जा महाराष्ट्र-महाराष्ट्राची गौरव गाथा ही राज्यस्तरीय ऑनलाइन व्हिडीओ स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 600 शाळांनी सहभाग घेतला होता. यात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकाविले आहे, तर या अ‍ॅपने राज्यातील 37 शाळांचे मोफत डिजिटलायझेशन करून देण्याचे जाहीर केले आहे. यात सीकेटी विद्यालयाची निवड झाली आहे.
महाराष्ट्राची गौरव गाथा सांगणार्‍या भाषण, नृत्य, गायन, चित्रकला अशा विविध कलांपैकी एका कलेचा अंतर्भाव करून त्याचा व्हिडीओ विद्यार्थ्यांनी ग्रोइंग डॉट अ‍ॅपवर अपलोड करावयाचा होता. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 ते 15 मेदरम्यान ही स्पर्धा झाली.
या स्पर्धेत सीकेटी विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील चार विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील 14 लाख प्रेक्षकांनी हे व्हिडीओ बघून त्यांना रेटिंग दिले तसेच नामवंत परीक्षकांनी परीक्षण करून अंतिम निकाल जाहीर केला. ऑनलाइन परितोषिक वितरण सोहळा डिस्ट्रिक गव्हर्नर हेमंत नाईक या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत तसेच महाराष्ट्रातील नामवंतांच्या उपस्थितीत 18 जुलै रोजी झाला.
सीकेटी विद्यालयाच्या परितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी अमर थळे (नृत्य, ़ि़द्वतीय क्रमांक), सई मयुरेश जोशी (नृत्य, उत्तेजनार्थ), संचिता सचिन तांबडे (वक्तृत्व, उत्तेजनार्थ) आणि स्वर चेतन म्हात्रे (गायन, उत्तेजनार्थ) यांचा समावेश आहे.
‘महाराष्ट्रभरातून अपलोड केल्या गेलेल्या 1400हून अधिक व्हिडीओंमधून आमच्या विद्यालयाच्या व्हिडीओंची निवड झाली आणि चार विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. कोविड महामारीच्या काळात मुलांचे सुप्त कलागुण विकसित व्हावे तसेच ललित कलांना व्यासपीठ मिळावे या प्रमुख उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. या अ‍ॅपने महाराष्ट्रातील 37 शाळांचे मोफत डिजिटलायझेशन करून देण्याचे जाहीर केले आहे. या शाळांमध्ये सीकेटी विद्यालयाची निवड झाली ही बाब विद्यालयाच्या नावलौकिकात भर घालणारी आहे” असे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. 

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply