Breaking News

प्रख्यात कवी सतीश काळसेकर यांचे निधन

पेण ः प्रतिनिधी

प्रख्यात कवी, संपादक, अनुवादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पेण येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश काळसेकर यांचा जन्म सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील काळसे गावी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण सिंधुदुर्गमध्येच झाले. पुढे मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ज्ञानदूत मासिकामध्ये नोकरी केली. काळसेकर यांच्या साहित्य निर्मितीचा आरंभ काव्य लेखनाने झाला. सुरुवातीला त्यांच्या कविता महाविद्यालयीन नियतकालिक तसेच नवाकाळ, मराठा यांसारख्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या. 1971मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला. या कविता संग्रहाने त्यांना साहित्य वर्तुळात ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली. कविता, अनुवाद, गद्य असे वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळले. ‘वाचणार्‍याची रोजनिशी’ या त्यांच्या पुस्तकाला 2014च्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्याआधी व नंतरही त्यांना विविध पुरस्कार, सन्मान लाभले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply