Breaking News

जनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री

चित्रा वाघ अनिल परब यांच्यावर संतापल्या

मुंबई : प्रतिनिधी

गुरुवारची पहाट कोकणासाठी दहशतीची ठरली. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणातील जनजीवन कोलमडून गेले. अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. दरम्यान चिपळूणचे नागरिक संकटात असतांना पालकमंत्री अनिल परब पळ काढतात, अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

आस्मानी संकटामुळे चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढेच नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी आठ कोविड रुग्ण दगावले, अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभे राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात, अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले? हे तर पळकुटे मंत्री आहेत, अशी संतापजनक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

चिपळूणमध्ये गुरुवारी आलेल्या महापुरात अडकलेल्या नागरिकांपैकी सुमारे दीड हजार नागरिकांची शुक्रवारी दिवसभरात सुटका करण्यात आली. मात्र अजूनही काही ठिकाणी नागरिक अडकले असण्याची आहे. महापुराचे पाणी चिपळूण शहरात गुरुवारी पहाटेपासून शिरू लागले. दुपारपर्यंत शहराचा सुमारे 70 टक्के भाग पाण्याखाली गेला. पूर्वानुभवानुसार नागरिकांनी पहिल्या मजल्यापर्यंत सर्व साहित्य हलवले होते. मात्र पाणी दुसर्‍या मजल्यापर्यंत पोचल्याने भयावह स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा अंदाज न आल्यामुळे असंख्य नागरिक आपापल्या घरात किंवा दुकानांमध्ये अडकून पडले होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply