Breaking News

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा : विदित गुजराथी उपांत्यपूर्व फेरीत

सोची (रशिया) ः वृत्तसंस्था

जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर असलेला भारताचा युवा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने अझरबैजानच्या वासिफ डुरारबायलीवर 1.5-0.5 अशा फरकाने विजय मिळवत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तब्बल 19 वर्षांनी प्रथमच एखाद्या भारतीय बुद्धिबळपटूने अशी कामगिरी केली आहे.पाचव्या फेरीतील दुसर्‍या डावात विदितने पांढर्‍या मोहर्‍यांनिशी खेळताना वासिफवर 38 चालींमध्ये विजय मिळवला. यापूर्वी 2000 आणि 2002मध्ये विश्वनाथन आनंदने विश्वचषक जेतेपद मिळवले होते. आता पुढील फेरीत 26 वर्षीय विदितसमोर रशियाचा अलेक्झांडर ग्रिसचूक आणि पोलंडचा जॅन क्रेझीस्टोफ यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल. दरम्यान, भारताचा युवा ग्रँडमास्टर निहाल सरिन याने बाएल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवाच्या जलद प्रकारात दुसरे स्थान पटकाविले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply