Breaking News

दाखले आपल्या दारी संकल्पनेला यश; सह्याद्री प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

कर्जत ः बातमीदार

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी कर्जत तालुका यांच्याकडून दाखले आपल्या दारी संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेंतर्गत तालुक्यातील 200 विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप त्यांच्या घरी जाऊन सह्याद्री प्रतिष्ठानकडून करण्यात आले. विद्यालयीन कामकाजासाठी दाखले आवश्यक असतात. त्या अनुषंगाने दाखले घरोघरी पोहचवण्याची जबाबदारी सह्याद्री प्रतिष्ठानने घेतली होती. सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख व नायब तहसीलदार संजय भालेराव यांची भेट घेऊन त्यांच्या परवानगीने इच्छुक व गरजूंची नावनोंदणी केली. प्रत्यक्ष गावोगावी जाऊन दुर्गसेवकांनी नावनोंदणी केलेल्यांना फॉर्म वाटप केले.  नेरळ, शेलू, कशेळे, खांडस, कडाव, बीड, खांडपे, वेणगाव, गौरकामत या भागांतील लहान पाड्यांवर जाऊन सह्याद्री विद्यार्थी अकादमीमधील सर्व सहकार्‍यांनी दाखल्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा केली. दाखले तयार झाल्यानंतर त्यांचे वितरण त्यांच्या घरी जाऊनही केले. दाखले आपल्या दारी मोहिमेंतर्गत एकूण 280 दाखल्यांची नोंदणी झाली. कागदपत्रांची पूर्तता करण्यास पात्र ठरलेल्या 200 लोकांना घरपोच दाखले देण्यात आले. 5 सप्टेंबर रोजी दाखले वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. कर्जत शहर भागातील काही दाखले शिशू मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका व सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या मार्गदर्शिका रेखा गोरे यांच्या हस्ते वितरित करून दाखले वितरणाच्या मोहिमेला प्रारंभ झाला. या कार्यक्रमात कर्जतच्या वेगवेगळ्या भागासाठी सुधीर साळोखे, प्रा. स्वप्नाली पाटील, मिथिलेश म्हामुणकर, हरेश मते, मंगेश रुठे, शाहीर गणेश ताम्हाणे, प्रणव जंगम, कौस्तुभ पेठे, रोहित देशमुख, हेमलता कांबळे, यतीन भोसले, नंदकुमार तांडेल, निरंजन ठाणगे, सुरज खडे, विशाल देशमुख, विक्रम विर्ले, चेतन फुलावरे, मयूर मोरे, अमोल पानमंद, पंकज ताम्हाणे, दिनेश ठाणगे, प्रमोद सावंत, नागेश भोईर, रितेश वायकर आदी दुर्गसेवकांचा विशेष सहभाग होता.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply