Breaking News

पूरग्रस्तांसाठी भाजपचा पुढाकार

विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या उपस्थितीत कोकणात मदत रवाना

मुंबई ः प्रतिनिधी

कोकणातील पूरग्रस्तांसाठी मुंबई भाजप आणि युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि. 27) जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या. माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मदतीच्या साहित्याची वाहने कोकणाकडे मार्गस्थ झाली.

अतिवृष्टीमुळे कोकणात अनेक ठिकाणी पूर येऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आधार देण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे यांनी धाव घेतली होती, तर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाडमधील पूरग्रस्तांना तयार अन्न, पाण्याचे वाटप सुरू केले. या मदतीचा ओघ आता वाढला असून तो व्यापक प्रमाणातही झाला आहे. मुंबई भाजपनेही यासाठी पुढाकार घेतला आहे. ही मदत रवाना करतेवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. या मदत सामग्रीमध्ये अन्न, पिण्याचे पाणी, चादरी, चटई, कपडे, सॅनिटरी नॅपकिन असे सगळे आहे.

या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, दौर्‍याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच, कारण सरकारने जीआरच काढला आहे. आम्ही दौर्‍यावर गेल्याने शासकीय यंत्रणा जागी होते, कामाला लागते. दौर्‍यावर गेल्याने लोकांचा आक्रोश समजून घेता येतो अन् तो सरकारपर्यंत पोहचवायला मदत होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply