Breaking News

उरणमधील आदिवासींना मदतीचा हात

उरण : वार्ताहर

शासनाच्या खावटी योजने अंतर्गत उरण तालुक्यातील बेलवाडी सारडे, पुनाडे वाडी, जांभूळपाडा वाडी, जासई वाडी येथील कातकरी वाडीवर धान्यवाटप करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षकवर्गाने अगदी पद्धतशीरपणे सर्व आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप करून त्यांची योग्य प्रकारे ऑनलाईन नोंदणी देखील करून घेतली.

या वेळी बेलवाडी सारडे कातकरी वाडीवर सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर व उरण सामाजिक संस्था यांच्याकडून देखील धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी चंदा नारायण वाघमारे या महिलेचे घर कोसळून सर्व सामानाची नासधूस झाल्याने ती अतिशय टेन्शनमध्ये होती, परंतु उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांचा आधारस्तंभ प्रा. राजेंद्र मढवी आणि संतोष पवार यांनी तिला समजावून धीर दिला, तर प्रमोद ठाकूर यांनी तिला जसे हवे तसे घर बांधून देण्याची जबाबदारी घेतली.

यावेळी तहसीलदारांच्या आदेशाने पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात पाठवला आहे. तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणवरून प्रकल्प अधिकारी देखील स्वतः या घटनेची तपासणी करण्यासाठी येणार आहेत.

बेलवाडी येथील सर्व कुटुंबांना भेटण्यासाठी उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, प्रमोद ठाकूर, कार्यकर्ता हर्ष पवार, खावटी योजनेचे उरण तालुका प्रमुख अप्पासो मोरे, दत्ता पाटील, खंडू पिचड, भैरू जाधव, सचिन माने उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply