Tuesday , March 28 2023
Breaking News

भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा उरणमध्ये शुभारंभ

उरण : वार्ताहर

उरण भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ जेएनपीटी विश्वस्त तथा रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी

(दि. 7) करण्यात आला. या वेळी बोलताना त्यांनी, कार्यकर्त्यांनी नवीन सदस्य नोंदणीसाठी जास्तीत जास्त भर द्यावा, असे सूचित केले.

उरण शहरातील ब्राह्मण सभा सभागृहात झालेल्या या शुभारंभ कार्यक्रमास नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, महिला मोर्चा अध्यक्षा संपूर्णा थळी, युवा मोर्चा अध्यक्ष नीलेश पाटील, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, शशी पाटील, नारायण नाखवा, मच्छिंद्र पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, महिला सरचिटणीस राणी म्हात्रे, प्रसाद पाटील, दीपक भोईर, नवघर जि. प. विभागीय अध्यक्ष महेश कडू, जसखारचे सरपंच दामुशेठ घरत यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आजपर्यंत देशात भाजपचे 11 कोटी सदस्य झाले आहेत. यापुढेही जास्तीत जास्त सदस्य बनविण्याचे आम्ही उद्दिष्ट ठेवले आहे, असे महेश बालदी यांनी सांगितले. हे अभियान संपूर्ण देशभर 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply