Breaking News

बॉक्सर पूजा राणी बॉक्सर पूजा राणी उपांत्यपूर्व फेरीत उपांत्यपूर्व फेरीत

टोकियो ः वृत्तसंस्था

भारतीय महिला बॉक्सर पूजा राणीने पहिल्याच फेरीत अल्जेरियाच्या चाईब इचार्कचा पराभव केला. इचार्कला हरवल्यामुळे पूजा उपांत्यपूर्व फेरीत पोहचली. पदकांच्या सामन्यात खेळण्यासाठी ती आता एक पाऊल दूर आहे.आशियाई चॅम्पियन आणि या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय खेळाडू पूजा राणीने 20 वर्षीय इचार्कला 5-0 असे सहज हरवले. पूजाने तिच्या अनुभवाचा उपयोग करीत इचार्क आणि सामन्यावर नियंत्रण राखले. या सामन्यात पूजाने संयम दाखवत नवख्या इचार्कला गुण मिळवण्याची संधी दिली नाही. 30 वर्षीय पूजा तिच्या सर्वोत्तम फॉर्मात आहे. मे महिन्यात झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. तत्पूर्वी मार्चमध्ये तिने विश्वविजेती अथेन्या बायलनवर सरशी साधली होती. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकाविले होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply