Breaking News

भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी

मुंबई ः प्रतिनिधी

राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप नेते आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. याबाबत प्रसिद्धीपत्रकात आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या पक्षाच्या बैठकीत दोन्ही सभागृहांतील भाजपच्या आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा आम्ही निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार विधानसभा आणि विधान परिषदेतील भाजपच्या सर्व सदस्यांंंचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करून घ्यावे आणि पूरग्रस्तांसाठी शासनाने जास्तीत जास्त मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करीत आहोत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply