Breaking News

महाडच्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पाली : रामप्रहर वृत्तसेवा

महापुराने महाडमध्ये आतोनात नुकसान केले आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रईसभाई कादरी यांनी महाडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

अतिवृष्टीमुळे सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांना पूर येऊन, पुराचे पाणी महाड शहर व परिसरातील घरे आणि दुकानांमध्ये घुसले होते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांची वाताहत झाली आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रईसभाई कादरी यांनी महाड तालुक्यातील लाडीवली मोहल्ला, जिजाऊनगर, मैत्री पार्क, गोंडाळा, करंजकोळ आदी गावात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

या वेळी अल्पसंख्याक दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस गौसखान पठाण, सैनिक सेल सुधागड तालुका अध्यक्ष प्रसाद लखीमले, सामाजिक कार्यकर्ते ग्यासुद्दीन खान, जावेद शेख, खालील सुर्वे, तन्वीर शेख, दिनेश बेलोसे, हर्षद पठाण, अल्लाउद्दीन शेख, असलम अब्दुल्ला ढोकले उपस्थित होेते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply