
पनवेल ः न्हावे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या मंजुषा गोपीचंद ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी गुरुवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची भेट घेतली. या वेळी उपसरपंच मंजुषा ठाकूर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. माजी सरपंच चंद्रकांत भोईर, सागरशेठ ठाकूर, उलवे नोड-2 उपाध्यक्ष सी. एल. ठाकूर, हरेश्वर म्हात्रे, गोपीचंद ठाकूर, विजय तांडेल, सतीश ठाकूर, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील सोबत होते.