Breaking News

रिक्षाचालकाच्या मुलींनी जिंकले सुवर्णपदक

पनवेल : वार्ताहर
खांदा कॉलनी सेक्टर 14मधील रिक्षाचालक अरविंद मोकल यांच्या संयोगिता व हर्षदा या दोन्ही मुलींनी सुवर्णपदक जिंकले आहे. या यशाबद्दल अरविंद मोकल यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलींचे कौतुक होत आहे.
मोकल हे रिक्षा व्यवसाय करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलींना क्रीडा क्षेत्रात आवड असल्याने रिक्षा व्यवसाय करून जमेल तशी मद्दत करीत प्रोत्साहन आपल्या मुलींना देत असतात.
पुणे बालेवाडी येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय किक-बॉक्सिंग स्पर्धेत संयोगिता अरविंद मोकल हीने पॉईंट फाईट या प्रकारात सुवर्णपदक व किक-लाईट प्रकारात कांस्यपदक जिंकले, तर हर्षदा अरविंद मोकल हिने पॉईंट फाईट व लाईट-कॉन्टॅक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. या मुली खांदा कॉलनीमध्ये प्रशिक्षक चिंतामणी मोकल यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत.
या स्पर्धेत संपूर्ण देशभरातून 1200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रायगड संघाने एकूण 25 सुवर्ण, 12 रौप्य, 13 कांस्य अशा एकूण 50 पदकांची कमाई केली. याबद्दल वाको महाराष्ट्र असोसिएशनचे उपाध्यक्ष व रायगड किकबॉक्सिंगचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर, राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजक संतोष म्हात्रे, चिंतामणी मोकल, निलेश भोसले, प्रशांत गांगुर्डे, युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे सर्व प्रशिक्षक व पालकांनी व महाराष्ट्र रिक्षा पंचायत शाखा खांदा कॉलनी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply