Breaking News

धडाकेबाज इलेव्हन संघ एनपीएलचा विजेता

पनवेल ः वार्ताहर

नेरे प्रीमियर लीग (एनपीएल) 2021चा बक्षीस वितरण समारंभ नेरे हायस्कूल येथे नुकताच पार पडला. या वेळी धडाकेबाज इलेव्हन संघाला भव्य चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला जनसेवा संघ नेरेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री म्हसकर, दर्शन ठाकूर, योगेश तांबोळी, शंकर ठाकूर, भास्कर कलोते, राम ठाकूर, अनिल पाटील, किसन खारके, राजाराम पाटील, प्रकाश घाडगे, दीपक पाटील, विनोद पाटील, प्रसाद चोरघे, निलेश खारके, केशव गवते आदी उपस्थित होते. एनपीएल नुकतीच झाली, मात्र बक्षीस वितरण समारंभ बाकी होता. हा कार्यक्रमही अखेर झाला. या वेळी प्रत्येक सामन्यातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूला सामनावीर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून परेश म्हस्कर, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून रोहन पाटील याला गौरविण्यात आले. उपविजेता सुयोग इलेव्हन संघ ठरला. या वेळी सरपंच राजश्री म्हसकर यांनी ग्रामपंचायतीतर्फे क्रिकेटच्या मैदानासाठी एक लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले, तर विजेत्या संघाने बक्षीस स्वरूपात मिळालेली रक्कम नेरे येथील हनुमान मंदिराच्या सुरू असलेल्या कामाला देण्याचे जाहीर केले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply