Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात शेअर मार्केटविषयक व्याख्यान

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी (दि.27) वाणिज्य विभागाने ‘शेअर मार्केटमधे निपुणता’ या विषयावर आभासी व्याख्यान आयोजित केले.
कार्यक्रमासाठी ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे प्रा. कौशलकुमार मिश्रा हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या व्याख्यानादवारे त्यांनी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमधे गुंतवणूक कशी करार्वी व मच्यूअल फंडबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना शेअर मार्केट गुंतवणूक, जोखीम विश्लेषणबद्दल प्रश्न विचारून माहिती आत्मसात केली. सुमारे 85 विद्यार्थ्यांनी या व्याख्यानामध्ये सहभाग घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शेअर मार्केट व मच्यूअल फंर्डचे सध्याच्या युगात असणारे महत्त्व पटवून दिले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. राहुल कांबळे यांनी केले तसेच प्रा. नम्रता गजरा, डॉ. अविनाश जुमारे, प्रा. नम्रता परिक, डॉ. महादेव चव्हाण यांनी सहकार्य केले.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आयोजकांची प्रशंसा केली. तसेच आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply