Breaking News

दिलासा! पनवेलमध्ये पॉझिटिव्हिटी दरात घट

महापालिकेतर्फे कोरोना चाचण्यांत वाढ

पनवेल : प्रतिनिधी

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आरटी-पीसीआर व अ‍ॅन्टीजन चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची प्रभावी अंमलबजावणी पनवेल पालिका कार्यक्षेत्रात केली जात आहे. गेल्या जुलै महिन्यामध्ये पालिकेने एक लाख आठ हजार 087 आरटी-पीसीआर व अ‍ॅन्टीजेन चाचण्या केल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे महापालिका कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर कमी झाला असून तो 2.60 टक्क्यापर्यंत खाली आणण्यात पालिकेला यश मिळाले आहे.

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच तिसरी लाट रोखण्यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रभावी उपाययोजना करत आहे. गेल्या महिन्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाबरोबरच चाचण्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. याचा सकारात्मक परिणाम पालिका कार्यक्षेत्रात दिसून येत आहे. सोसायटीमधील एका विंगमधील एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास पूर्ण विंगच्या आरटी-पीसीआर चाचण्या करून कोरोनाची साखळी तेथेच खंडित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संभाव्य तिसर्‍या लाटेची सर्वत्र चर्चा सुरू असताना महापालिकेने देखील पूर्वतयारी सुरू केली आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत महापालिका चाचण्यांवर भर दिला जात आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील चार प्रभागातील प्रभाग अधिकारी पोलीस विभागाशी समन्वय साधून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील विविध पथके पनवेल, न्यू पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा या नोडमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार चाचण्या करण्यात येत आहे.

या नोडमधील गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानके, बस स्थानके, डी-मार्ट, भाजी बाजार, दुकाने, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, चेक पोस्ट, शासकिय आस्थापना, औद्योगिक वसाहती, तसेच कंटेन्मेंट झोन या ठिकाणी दिवसाला एकूण 4000 चाचण्या केल्या जात आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखाण्याच्या दृष्टीने नागरिकांनी चाचण्यांसाठी मदत करावी, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply