Tuesday , February 7 2023

कामोठे, आजिवली येथे विकासकामे

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित कार्यकर्त्यांनी हार, तुरे, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, सत्कार यावर खर्च न करता पूरग्रस्तांना मदत करून आणि लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुवारी (दि. 5) पनवेल तालुक्यात विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.

कामोठे : नगरसेवक विजय चिपळेकर यांनी आपल्या विकास निधीतून येथील सेक्टर 35मध्ये आम्रवन येथे पथदिव्यांची व्यवस्था केली. या पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. आम्रवनात संध्याकाळी येणार्‍या अबालवृद्धांना या पथदिव्यांचा लाभ होणार आहे. या कार्यक्रमाला नगरसेवक विजय चिपळेकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक विकास घरत, महिला अध्यक्ष वनिता पाटील, सरचिटणीस शरद जगताप, भाजप नेते प्रदीप भगत, प्रशांत कदम, रश्मी भारद्वाज, राहुल पहवा, संदीप तुपे, युवराज पाटील आदी उपस्थित होते.

पनवेल : भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अजिवली गावच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या वेळी ज्ञानेश्वर भगत, जगन्नाथ सार्डेकर, भाजप ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष आप्पा भागीत, संतोष पाटील, महेश माळी, सुरज गायकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply