मोहोपाडा : प्रतिनिधी
रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित रायगड जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रसायनीतील खेळाडूंनी शानदार कामगिरी करून पाच सुवर्ण, दोन रौप्य व सहा कांस्य अशी एकूण 13 पदक जिंकली.
स्पर्धा खांदा कॉलनी येथे झाली. स्पर्धेचे आयोजन जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि वाको किकबॉक्सिंग असोसिएशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनचे सचिव निलेश भोसले यांनी केले होते. स्पर्धेत जिल्ह्यातील 565 खेळाडूंनी सहभाग घेतला. महाड, माणगाव, खालापूर, कर्जत, पेण, पनवेल, अलिबाग आदी ठिकाणांहून स्पर्धक आले होते. यामध्ये रसायनीतील प्रशिक्षक संजय पाटील यांच्या संघातील 13 खेळाडूंनी विविध पदके जिंकली.
रसायनीतील विनायक संजय पाटील, अर्जुन विशाल जाधव, ज्ञानेश्वर लक्ष्मण कदम, अनसूया लक्ष्मण कदम, प्रांजळ प्रशांत धुमाळ यांनी सुवर्ण, जान्हवी बाळकृष्ण आगज व वरद संजय पाटील यांनी रौप्य, तर स्वराज रामदास काठावले, स्वरूप सदाशिव पाटील, धनंजय शिवाजी अहिरे, भावार्थ प्रशांत धुमाळ, ऋषिकुमार कृष्णकुमार पनारिया व ऋषभ नरेश मोरे यांनी रौप्यपदक पटकाविले. या सर्वांचे अभिनंदन होत आहे.
वाको महाराष्ट्र किकबॉक्सिंग अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी स्पर्धा आयोजन तसेच कौतुक रायगड जिल्ह्यात या खेळाच्या प्रचार व प्रसाराबद्दल अभिनंदन केले.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …