Breaking News

स्कूल कमिटी चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गव्हाण विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गव्हाण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाच्या स्थानिक ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समितीचे सदस्य, तसेच शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला.

समारंभाचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मनोगतात विद्यालयाने यशाची कमान अशीच उंचावत ठेवून गुणवंत विद्यार्थी घडवावेत, असे प्रतिपादन केले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक यांचेही अभिनंदन केले.

विद्यालयाचा एचएससी (12वी) परीक्षा 2021चा निकाल 100 टक्के लागला असून, कला शाखेतून व विद्यालयातून नेहा केशव साळवे 82.67% (496) प्रथम, साईराज बाळकृष्ण कोळी 80% (480) द्वितीय, सृष्टी कान्हा म्हात्रे 75.17%(451) तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेतून किशोरी मनोज पाटील 81.17% (487) प्रथम, मनस्वी नरेश घरत 79.67% (478) द्वितीय, अनिशा महेश म्हात्रे 74.33% (446) तृतीय आली आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, ‘रयत’चे लाइफ मेंबर प्रमोद कोळी, लाइफ वर्कर रवींद्र भोईर, उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके आदींनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करणारे जुनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे तसेच प्रा. राजेंद्र चौधरी, प्रा. माणिक घरत, प्रा. राजू खेडकर, प्रा. उमेश पाटील, प्रा. जयवंती ठाकूर, प्रा. अर्चना पाटील या अध्यापकांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, ‘रयत’चे लाइफ मेंबर प्रमोद कोळी, लाईफ वर्कर रवींद्र भोईर, जुनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद कोळी यांनी केले. सागर रंधवे यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे अभार रवींद्र भोईर यांनी मानले.

शिष्यवृत्ती परीक्षेत 14 विद्यार्थी उत्तीर्ण

एनएमएमएस या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेज मधील 28 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचा सत्कार भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला.

परीक्षेतील भाविका धनंजय कोळी, भाविका संजय कोळी, गुलबा हस्त खातून अजहजर हुसेन चौधरी, मनस्वी केशव कोळी, जान्हवी हरेश घरत, श्वेता बाबासाहेब घाडगे, किरण संजय जयस्वाल, वेदांत काशिनाथ कोळी, निल दिलीप पाटील, दीपक सुदाम बचाटे, रोहित राम गुळवे, अन्वय तुकाराम गुळवे, आर्यन रामदास पारिंगे, सुयोग विकास नाईक हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या विद्यार्थ्यांचे शिक्षक विभाग प्रमुख प्रदीप काकडे वद्रौपदी वर्तक अध्यापकांचे तसेच मार्गदर्शक उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply