Breaking News

जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसमोर घंटागाड्यांचा मुक्काम

केगाव नागरिकांच्या आरोग्यास धोका

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यातील केगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या समोर जीवनावश्यक वस्तूंची विक्रीचे दुकाने व त्याचजवळ केगाव ग्रामपंचायतची घंटागाडी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका संभवत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायत समोरील बाजूस वडापाव गाडी, भाजीपाला दुकान, जवळच सरकारमान्य धान्य दुकान व जवळच कडधान्य टेम्पो अशी दुकाने आहेत. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने केगाव परिसरातील ग्रामस्थ, नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी येथे येत असतात. तेथे कचरा साचलेला असतो, सफाई केली जात नाही, अशी नागरिकांची चर्चा आहे. अशा दुकानांजवळच केगाव ग्रामपंचायतीने घंटागाड्या ठेवल्या आहेत. गावातील, परिसरातील कचरा, घाण, दुर्गंधी, कचरा घंटा गाडीत गोळा केला जातो व त्याच गाड्या ह्या ठिकाणी लावल्या जातात. त्यामुळे दुर्गंधीयुक्त गाड्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने केगाव गावातील नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी दुर्गंधीयुक्त घंटागाड्या दुसरीकडे उभ्या कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ ग्रामपंचायतीकडे करीत आहेत. नागरिकांचे आरोग्य चांगले कसे राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दुर्गंधी युक्त गाड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सलग चौथ्यांदा विजय

बाळाराम पाटलांची पराभवाची झाली हॅट्रिक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम …

Leave a Reply