Breaking News

पनवेलमध्ये आयव्हीएफ सेंटर

पनवेल : वार्ताहर

भारताची सर्वांत मोठी फर्टिलिटी ट्रीटमेण्ट्स साखळी असलेल्या इंदिरा आयव्हीएफने पनवेलमध्ये आयव्हीएफ सेंटर उपलब्ध करून दिले आहे. पनवेलमधील के मॉलजवळ व रेल्वे स्थानकालगत हे सेंटर नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.

इंदिरा आयव्हीएफने मागील दशकामध्ये 85 हजारहून अधिक जोडप्यांना गर्भधारणेमध्ये मदत केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रख्यात आणि वैद्यकीय तज्ञ व आयव्हीएफ स्पेशालिस्ट्सद्वारे कार्यसंचालित संस्थेने त्यांच्या प्रक्रियांसाठी अभूतपूर्व यश गाठले आहे. त्यांनी इलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टिम्स, बंदिस्त कार्यरत चेम्बर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मायक्रोफ्लूइडिक्स अशा आधुनिक सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यामधून देशभरातील, तसेच महाराष्ट्रातील जोडप्यांना सर्वोत्तम उपचार पद्धती उपलब्ध असल्याची खात्री मिळते.

इंदिरा आयव्हीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक डॉ. क्षितिज मुर्दिया म्हणाले, आम्हाला पनवेलमध्ये आमच्या केंद्राचे उद्घाटन करण्याचा आणि बाळ असण्याची इच्छा असलेल्या जोडप्यांना मदतीचा हात पुढे करण्याचा खूप आनंद होत आहे. आयव्हीएफ प्रक्रियेबाबत सांगताना इंदिरा आयव्हीएफ पनवेल येथील केंद्रप्रमुख डॉ. उदय कारगर म्हणाले, आयव्हीएफ उपचार सुरू करण्यापूर्वी जोडप्यांचे विविध सोल्यूशन्स व निष्पत्तींबाबत समुपदेशन केले जाते. त्यानंतर वंध्यत्वाचे कारण समजण्यासाठी दोघांची तपासणी केली जाते आणि त्यानुसार उपचार पद्धत ठरवली जाते.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply