Breaking News

कर्जतच्या खेळाडूंचा प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

अहमदनगर येथे झालेल्या पहिल्या सीनियर आणि मास्टर राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत कर्जतच्या किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे.         

किकबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष नीलेश शेलार यांच्या विद्यमाने आयोजित या स्पर्धेमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व सर्व नियमांचे पालन करून खेळ प्रकार लाइट कॉन्टेक्ट, किक लाइट, के 1, म्युजिकल फॉर्म, पॉइंट फाइट हे प्रकार होते. संपूर्ण महाराष्ट्रातून 544 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या खेळाडूंमधून कर्जतच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

प्रशिक्षक सौरभ नवले (सुवर्ण पदक फुल कॉन्टेक्ट फाइट ), जीवन ढाकवळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली.

कर्जतच्या रोशन गुरव, योगेश जाधव (सुवर्णपदक फुल कॉन्टेक्ट फाइट), प्रतिक म्हसे, वीरेंद्र देवरे, जय कवळे (रौप्यपदक, पॉइंट फाइट), भूषण बडेकर (रौप्य व कांस्यपदक, पॉइंट फाइट, म्युजिकल फॉर्म), रोहिणी मोडक (रौप्यपदक), दक्षता उंबरकर (कांस्यपदक), ऐश्वर्या सुळे (कांस्यपदक), ध्रुपदा जमदाडे (कांस्यपदक), प्रगती पाटील (रौप्यपदक) हे विजेता ठरले आहे.

प्रशिक्षक जीवन ढाकवळ आणि प्रशिक्षक-व्यवस्थापक संदीप अगिवले, विवेक गायकवाड यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले  तसेच गोवा येथे होणार्‍या नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply