रोहे ः प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील तिसे येथे 23 वर्षीय युवकाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच कोलाड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी आणि महिला फिर्यादी हे एकाच गावातील असून एकमेकांच्या परिचयाचे आहेत. 20 एप्रिल रोजी आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला. या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम 376 (2) (1), 376 (3) 354 (अ), 354 (ड) बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012चे कलम 4, 8, 12प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि. पी. एस. तायडे करीत आहेत.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper