Breaking News

मानिवलीतील स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत : बातमीदार

ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त कर्जत तालुका पंचायत समिती आणि ग्रुपग्रामपंचायत मानिवली यांच्या संयुक्त विद्यमाने मानिवली येथील हुतात्मा स्मारकात सोमवारी (दि. 9) आयोजित केलेल्या कार्यक्रमात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला. कर्जत तालुक्यातील मानिवली येथील हुतात्मा स्मारकातील स्वातंत्र्यसेनानी गोमाजी पाटील सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हुतात्मा हिराजी पाटील यांचे नातेवाईक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला. त्यात विठ्ठल वाळकू पाटील, शरद राघो भगत, जयराम गवळी, लीलाबाई तरे, रमेश गवळी, अनसूया जामघरे आदींचा समावेश होता. या वेळी पं. स. सभापती सुषमा ठाकरे, जि. प. सदस्या अनसूया पादिर, सीमा पेमारे, माजी सभापती सुजाता मनवे, माजी उपसभापती अरविंद पाटील, सदस्या कविता ऐनकर, माजी सदस्य विष्णू झांजे, गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, मानिवलीचे सरपंच तुषार गवळी, उपसरपंच संकेत पाटील, गटशिक्षणाधिकारी सुरेखा हिरवे यांच्यासह  दहिवली केंद्रप्रमुख, मानिवली शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply